मिस परफेक्ट (भाग 6) - Wordflyz

मिस परफेक्ट (भाग 6)

माधवी ला ऑफिस मधल्या लोकांचं असं उशिरा पर्यन्त थांबलेलं आवडलं नाही…

“काय गं सुनीता, तुला तरी पटतंय का हे?”

“कुणाला पटेल सांग..हा बॉस इतका स्ट्रिक्ट आहे ना, बोलायला गेलो तर नोकरीवरून काढून टाकेल..”

“मी बोलते मग..”

“अगं वेडी आहेस का, एक तर तू आत्ताच जॉईन झालीये..”

“मग काय झालं, मला असही गरज नाहीये जॉब ची…वेळ जावा म्हणून करतेय…आणि घरात मी काही वाढवा करू नये म्हणून सासूबाईंनी पिटाळलय मला…”

“काय??”

“ते सोड… मी आलेच..”

“अगं ए…थांब..अगं ऐक माझं..”

माधवी कुणाचंही न ऐकता बॉस च्या केबिन मध्ये शिरते…

“मी काय म्हणते सर…ऑफिस चा टाइम 9 ते 5 असताना तुम्ही उशिरा पर्यन्त त्यांना का बसवून ठेवता?”

माधवी च्या या सडेतोड आणि सरळ प्रश्नाने बॉस गोंधळला…

“हे बघा..ऑफिस मध्ये खूप कामं असतात…डेडलाईन पूर्ण कराव्या लागतात…काम शेवटी महत्वाचं..”

“पण कामगार खुश असले तर काम नीट होईल ना…ते उगाच वैतागून जातात, नाईलाजाने ते थांबताय, काहींना काम नसेल तरी केवळ तुमच्या धाकाने ते थांबताय….”

“हे बघा, तुम्ही मला शिकवू नका…पटत नसेल तर राजीनामा द्या अन निघा…”

“बरं…”

माधवी बॉस समोर असलेली डायरी आपल्याकडे ओढते..बॉस च्या खिशातून पेन काढून घेते…आणि लिहिते…

“I am resigning… Goodbye…”

“हे काय? असा असतो राजीनामा? काही पद्धती माहिती आहेत की नाही?”

“हे बघा, भलंमोठं लेटर लिहून शेवटी काय सांगायचं असतं? की मी जातेय, बसा बोंबलत…. मग उगाच पानभर मजकूर लिहून तुमचा अन माझा वेळ कशाला वाया घालवायचा सांगा बरं? भावना पोचल्या म्हणजे झालं…

“अवघड आहे तुमचं…”

“उलटं बोललात, गोष्ट सोपी केली मी…आयुष्य फार सोपं असतं हो, आपण त्याला अवघड बनवून टाकतो..”

“हो का?”

“हो…चला येते मी…सांभाळा कंपनी नीट…”

“मालकाला सांगतेय, कंपनी नीट सांभाळा म्हणून..”

माधवी डेस्क वरचं आपलं समान उचलते…

इकडे बॉस च्या केबिन मध्ये तो कलाइन्ट परत येतो, हा तोच तो…ज्याने ऑफिस मध्ये येऊन गोंधळ घातला होता…

“साहेब…हे घ्या पेढे…”

“कसले?”

“अहो माझा तोट्यात असलेला माल नफ्यात खपला गेला…नेहमीपेक्षा जास्त नफा झाला मला…कर्जबाजारी होण्यापासून वाचलो मी…आणि तुम्हाला मिळणारा नफाही दुप्पट असेल आता…हे फक्त तुमच्या त्या कंपनीतल्या मुलीमुळे शक्य झालं आहे…कुठे आहे ती बोलवा तिला…”

बॉस चांगलाच गोत्यात येतो…

“बसा, मी आणतो तिला बोलवून..”

बॉस सैरभैर होऊन ऑफिस मधून बाहेर पळत सुटतो…माधवी ला शोधायला…ऑफिस मधले सगळे बॉस चा असा अवतार पहिल्यांदाच पाहतात…

माधवी गाणं गुणगुणत आपली स्कुटी पार्किंग मधून बाहेर काढत असते…

“माधवी ऐक ना…नको जाऊ कंपनी सोडून…”

“आता काय झालं?”

“तो कलाइन्ट….नफा…तुझ्या आयडिया…”

बॉस धापा टाकत टाकत म्हणतो…

“बरं, मग…परत येऊ?”

“हो प्लिज… तुम्हाला इथून काढलं म्हटल्यावर तो कलाइन्ट चिडले, आमच्यासोबत काम करणं सोडेल अन कंपनी तोट्यात येईल माझी…”

“बरं.. मग रिक्वेस्ट करताय की…”

“रिक्वेस्ट…प्लिज या परत..आणि मला माफ करा…”

ठीक आहे..

मोठ्या रुबाबात माधवी परत ऑफिस मध्ये शिरते…

“ऑफिस मधले लोकं विचारतात, सर कुठेय?”

“माझी गाडी पार्क करताय…”

“आं?????”

सर्वजण अवाक होऊन पाहत उभे राहिले…

“छे… थापा मारत असेल ही…”

इतक्यात बॉस गाडीची चावी, माधवी ची पर्स आणि तिचं काही समान हातात घेऊन येतो..

“बापरे…बॉस ला हिने कामाला लावलं डायरेक्ट? काय मुलगी आहे…”

बॉस झपझप पावलांनी आपल्या केबिन मध्ये जातो..

मध्ये असलेला कलाइन्ट म्हणतो,

“सर… किती वेळ..आणि ती मुलगी?”

“येतेय..”

माधवी आत शिरते तसा तो कलाइन्ट तिला पेढा भरवतो…

“मॅडम, तुम्ही काम सोपं केलंत बघा माझं, फार मोठं संकट तुमच्या मुळे टळलं ..”

“ऐकून बरं वाटलं, अशीच प्रगती करत रहा…”

कलाइन्ट निघून जातो…

“बरं सर, चला बाहेर, आपल्याला घोषणा करायची आहे..”

“कसली?”

“चला तर खरं..”

माधवी बॉस चा हात पकडून त्याला बाहेर आणते..

“तर मित्रहो, बॉस ने सर्व कामगारांचा विचार करून असा निर्णय घेतलाय की…ऑफिस च्या वेळे व्यतिरिक्त कुणीही इथे जास्त वेळ थांबणार नाही…”

“ओ मॅडम…काय बोलताय? हे शक्य नाही…”

“बरं..जाऊ मी? तो कलाइन्ट अजून पार्किंग मधेच असेल…”

“माधवी मॅम बरोबर सांगताय..आजपासून मी कामगार हिताचा हा निर्णय घेतोय…त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!