मिस परफेक्ट (भाग 4) - Wordflyz

मिस परफेक्ट (भाग 4)

“हे बघ…माझा स्वभाव फार कडक आहे…मला खूप शिस्त लागते घरात. शाळेत शिक्षिका आहे ना, त्यामुळे स्वभावच बनलाय तसा…आता तुझ्यावर जबाबदारी असणार आहे…सकाळी लवकर उठावं लागेल…उठशील ना?”

“सवय नाही..पण करेन मी सवय..त्यात काय इतकं?”

“आणि हो…स्वयंपाक शिक…सध्या मला मदत कर फक्त…”

“चालेल..”

“चल आज खजुराची चटणी बनवायची आहे…हे घे खजूर आणि बिया काढून मला आणून दे..”

“Okk…”

माधवी ते घेऊन हॉल मध्ये जाते, बऱ्याच वेळाने दुर्गा बाईंकडे येते..

“इतका वेळ? आण बघू…”

माधवी खजुराच्या बिया पुढे करते..

“खजूर कुठेय?”

“खजूर कशाला लागताय? तुम्ही बिया मागितल्या होत्या ना? खजूर मी खाऊन टाकले..”

दुर्गा बाई कपाळावर हात मारून घेतात..


“अगं बाई शब्दशः अर्थ घ्यायचा असतो का..”

“जे सांगितलं ते केलं..बरं जाऊद्या, यावर चर्चा करून उपयोग नाही…सोल्युशन काय आहे ते सांगा..”

“एकच सोल्युशन, तू तासभर बाहेर थांब…मी आजचा स्वयंपाक आटोपते..”

“ठीक आहे…”

इकडे दुर्गा बाई बडबड सुरू करतात…

“आईने शिकवायला हवं होतं मुलीला…इतकाही वेंधळेपणा चांगला नाही…”

माधवी च्या कानावर ते पडतं… काय करायला हवं तिने? भांडायला हवं होतं? उलट उत्तर द्यायला हवं होतं की गपचुप ऐकून घ्यायला हवं होतं?

माधवी आईला फोन लावते…

“आई तू मला काही शिकवलं का नाहीस??”

दुर्गा बाई घाबरत बाहेर येतात…माधवी कडून फोन हिसकावून बोलतात…

“काही नाही ताई…गम्मत…” असं म्हणत फोन ठेऊन देतात..

“अगं ए…आमच्यात भांडण लावतेस का आता..”

“तुम्हाला म्हणालात ना, आईने शिकवायला हवं होतं… मग मी तेच आईला विचारलं, की शिकवलं का नाहीस?? सिम्पल…”

“माफ कर मला…पुन्हा असा आगाऊपणा मी करणारच नाही..कानाला खडा..”

इतक्यात तुषार वर्तमानपत्र घेऊन माधवी कडे येतो..

“माधवी हे बघ…शहरात एका कंपनीत vacancy आहे..खूप चांगली पोस्ट आहे आणि पगारही चांगला आहे..जातेस का interview ला?”

“हो हो…खरंच जा…घरातले खजूर तरी संपणार नाहीत…” दुर्गाबाई सांगतात…


“खजूर??”

“काही नाही…कधी आहे interview?”

“उद्याच…”

माधवी तयार होते अन interview ला जाते…

बाहेर अनेक candidates बसलेले असतात, प्रत्येकजण टेन्शन मध्ये असतो…

एकेकाला आत बोलवतात..

“May I come in sir?”

“Yes come in..”

“तर मिस्टर सूचित…काय अनुभव आहे तुम्हाला?”

“सर माझं ms-cit झालेलं आहे. अजून 1 कॉम्प्युटर कोर्स झाला आहे. 2 वर्ष एका खाजगी कंपनीत काम केलं..”

“मग ती नोकरी सोडून इथे का आलाय?”

“मला ग्रोथ हवी होती सर, या नावाजलेल्या कंपनीत मला माझं कौशल्य apply करायला आवडेल..”

(सत्य असं होतं की आधीच्या कंपनीत बॉस सोबत भांडण झालेलं आणि याने तडकाफडकी नोकरी सोडलेली)

“बरं… आम्ही तुम्हाला का म्हणून नोक्रो घ्यावं??”

Interview घेणारा चांगलाच खमका होता…

“सर माझ्यात ते सर्व स्किल आहे जे या कंपनीला वर नेऊ शकेल….”

स्वतःचं कौतुक आणि बढाया मारायला सूचित ने सुरवात केली..


“ठीक आहे या तुम्ही…next??”

पुढचा नंबर माधवी चा असतो…

माधवी सरळ दार उघडून आत येते अन बसते…

“दार knock करून यायचं असतं मिस माधवी…एटिकेट्स माहीत नाही का??”

“कसं आहे सर…एक तर तुम्ही आम्हाला इथे बोलावलं म्हणजे आत घेणारच आणि बसवणारच…may i come in म्हटल्यावर आजतागायत कुणी “no” असं म्हटलेलं नाही…आणि उगाच त्यात वेळ घालवून कंपनीच्या productivity वर फरक का पाडून घ्यायचा?”

Interview घेणाऱ्याला त्याच्या वरचढ मुलगी भेटली होती…

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!