मिस परफेक्ट (भाग 7) - Wordflyz

मिस परफेक्ट (भाग 7)

माधवी ने ऑफिस मधल्या satff साठी खूप चांगलं काम केलं..त्यांना वेळेत घरी जायची सोय लावून त्यांचं वर्क लाईफ balance तिने घडवून आणलं.

ती ऑफिस सुटलं अन घरी जात होती. नेहमीच्या रस्त्याने, अचानक तिने गाडी थांबवली, रस्ता गर्दीने भरला होता, ट्राफिक जाम झाली होती. तिने गाडीखाली उतरून पाहिलं, सात आठ गाड्या सोडून पुढे एक अपघात झाला होता…माधवी तडक गाडीतून उतरली, जवळ जाऊन पाहते तर…दोन गाड्यांची फक्त हलकीशी टक्कर झालेली, रिक्षावल्याच्या रिक्षा ला मागे एक कोच गेलेलो फक्त…त्यांचं भांडण चालू होतं….

“माझ्या रिक्षा चं नुकसान केलं…मला पैसे हवे..”

“चूक तुझी होती…तू मध्ये आलास… अन वर पैसे मागतोस?”

“मी पोलिसात जाईन..”

“काही होणार नाही पोलिसात जाऊन…माझी पोहोच खूप वरपर्यंत आहे..”

“असुदे..आम्ही सर्व रिक्षावाले मिळून मोर्चा काढू…”

“मी मोर्च्या वर लाठीमार करायला सांगेल..”

“आम्ही एकेकाला धरून मारू..”

माधवी सर्वांना बाजूला करत मध्ये घुसते..

“अरे ए ए ए…पार मोर्चा अन लाठीमार पर्यन्त बाता मारताय…इतकं काय झालं नाहीये..”

“ओ मॅडम, माझी रिक्षा पहिली का…कोच पडलीये तिला…”

“हो? किती मोठं नुकसान झालंय नाही का?? आणि काय हो, तुम्ही चारचाकीत फिरणारे…यांना दिले 500 रुपये तर काय अडतंय तुमचं??”

“मी ऐकणार नाही..”

दोघांचा हाच सूर…दोघेही हलायला तयार नव्हते….आणि पूर्ण रस्ता जाम करून टाकलेला…

माधवी ला आता या दोघांना तिथून घालवायचा एकच मार्ग दिसतो…

ती हळूच आपल्या बॅग मधून तिचं नेलकटर काढते आणि दोघांच्या हातावर हलकच ओरखडा मारते..

“ओ मॅडम, काय करताय…”

“हे बघा, तुमच्यामुळे अख्या रस्त्याला थांबून राहावं लागतंय, आता एक काम करा, दवाखान्यात जा दोघे..”

“का?”

“हे जे नेलकटर मारलंय ना तुमच्या हातावर, त्याला गंज चढक होता, आता लवकर टिटी चं इंजेक्शन घ्या, नाहीतर…”

“ओ मॅडम…काय केलंत…थांबा तुम्हाला जेल मधेच टाकतो..”

“आधी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये टाका मग बघू..”

रिक्षावाला अन कारवाला दोघेही हातात हात धरून दवाखान्यात पळतात…त्यांच्या गाड्या गर्दी बाजूला करते अन रस्ता मोकळा होतो…जाता जाता भाजीपाला घेऊन जाते…

माधवी घरी जाते… घरी सासूबाईंच्या काही मैत्रिणी आलेल्या असतात…माधवी त्यांच्याशी काही वेळ बोलते आणि निघून जाते…तिला समजतं, या बायका काही लवकर उठणार नाही, वैतागण्यापेक्षा काहीतरी उपयोग करून घ्यावा…

माधवी तिने आणलेल्या भाजीपाल्याच्या जुड्या समोर ठेवते…आणि त्यांच्यासमोर निवडत बसते…

त्या बायका गप्पांमध्ये रममाण असतात…एका बाई सहज भाजीपाला कसा आहे बघायला हात लावते तोच..

“अहो राहुद्या…तुम्हाला वाटत असेल मला एकटीला जड होईल हे काम…एक तर कामाहुन दमून आलीये…काही नाही, मी करेन..”

“अं? अगं मी…आण की, निवडते मी..”

त्या बाईचं पाहून अजून 2-3 बाया भाजी निवडत बसतात, माधवी हळूच तिथून सटकते…बघता बघता बायका भाजीपाला निवडून टाकतात…दुर्गा बाईंना हसू येतं…

माधवी भाजी निवडून झालीये हे पाहून बाहेर येते..

“आई चला जेवायला…मावशी तुम्हीही बसा आमच्या सोबत..”

“नको बाई…तुम्ही जेवा..आम्ही बसतो इथेच..”

अरे देवा, माधवी ला वाटलं आता तरी उठतील..कसलं काय…

“नाही हं , तुम्हालाही जेवावे लागेल आमच्यासोबत.. मी की नई आज मस्त कांद्याचा शिरा केलाय..”

“काय?? जेवा तुम्ही, आम्ही येतो..”

बायका निघून जातात अन दुर्गा बाई मोकळ्या होतात..

इतक्यात दुर्गा बाईंना एक फोन येतो अन घरातलं वातावरणच बदलून जातं.. दुर्गाबाई रडायला लागतात…

त्यांचा भाऊ ऍडमिट आहे अशी बातमी त्यांना मिळालेली असते…त्या तडक दवाखान्यात निघतात, सोबत माधवी आणि तुषार येतात…

दवाखान्यात पोचताच…

“पेशंट शुद्धीवर येत नाही तोवर काही सांगता येणार नाही…तुम्ही एकेक जण जाऊन भेटू शकता..”

दुर्गा बाई जातात…

“दादा, अरे उठ की…हे काय होऊन बसलं… दादा तुला उठावं लागेल…”

दुर्गाबाई खूप प्रयत्न करतात…पण सगळं निष्फळ…

तोवर इकडे तुषार अन माधवी मामांबद्दल बोलत असतात..

“मामांना आजार होता का कसला?”

“नाही…त्यांना खूप टेन्शन असायचं, मुलीच्या लग्नाचं..मुलाच्या शिक्षणाचं… “

दुर्गाबाई रडत बाहेर आल्या…नंतर तुषार जातो..मामा तसेच बेशुध्द..

आता बारी येते माधवी ची..

क्रमशः

bindhast girl, daughter in law india, funny lady, must read marathi story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!